एकेकाळी जगाच्या आकाशात दिमाखाने संचार करणाऱ्या एअर-इंडियाचा ताबा राजकारणी आणि नोकरशहांकडे गेला, आणि ही कंपनी आतून पोखरून निघायला सुरुवात झाली
प्रत्येक चांगल्याचे श्रेय घ्यायचे आणि वाईटाचे खापर विरोधकांवर फोडायचे, या न्यायाने सध्याचे राजकारण खेळले जात आहे. त्याचाच भाग म्हणून एअर-इंडिया या भारतातल्या सरकारी मालकीच्या हवाई सेवेची मालकी निर्गुंतवणुकीच्या योजनेंतर्गत पुन्हा एकदा टाटा समूहाकडे दिली गेली, तेव्हासुद्धा विद्यमान सत्ताधार्यांनी फार मोठे क्रांतिकारक कार्य केल्यागत स्वतःचे कौतुक करून घेतले. या विमान कंपनीचा गाडा रन-वेवरून कसा घसरला?.......